सर्वसमावेशक आर्थिक विकास

pin pointer

अर्थव्यवस्थेस चालना देऊन त्यायोगे रोजगार निर्मिती करणे.

pin pointer

दरडोई ऊर्जावापर किमान पातळीवर आणणे.

pin pointer

स्थावर प्रकल्प जलद गतीने निर्माण करता येतील अशी व्यवस्था राबविणे

महानगर प्रदेशातील आर्थिक व्यवस्थेमधील अभूतपूर्व बदलामुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता विविध संधी उपलब्ध होतील.

जमिनीमधून उत्पन्नांचा स्त्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने जमिनीच्या वैध चलनीकरणाची योजना करण्याचा मानस आहे. त्यामुळे प्रकल्प जलदरित्या कार्यान्वित होऊन स्थावर मिळकत क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त होईल.

भाविष्यवेधी सुसूत्र नगरनियोजनामुळे पुणे महानगर प्रदेश अधिक कार्यक्षम होईल अन् त्यायोगे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन होऊन लोकांसाठी वाढीव प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली जाईल.वरील सर्व बाबींमुळे महानगर प्रदेश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी अन् समतोलरित्या विकसित होईल.