समाजाप्रती एक समृद्ध भविष्याची निर्मिती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकासाबाबत घेतलेल्या पुढाकाराला गती देण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक तसेच खाजगी सहभाग या बाबी महत्वाच्या आहेत. नजीकच्या भविष्यात जागतिक पातळीवर पुणे महानगर प्रदेश म्हणजे एक नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा असणार आहे. म्हणूनच देशी तसेच परदेशी गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त आर्थिक परतावा देणाऱ्या आकर्षक गुंतवणूकीच्या संधी निर्माण करणे हे खाजगी आणि थेट गुंतवणूक विभागाचे ध्येय असेल.

खाजगी आणि थेट परकीय गुंतवणूक विभागाची ठळक वैशिष्टे

जागतिक गुंतवणूकदारांसाठी, येथील व्यवसायाभिमुख वातावरण आणि सद्यस्थितीतील विकासाचा दर लक्षात घेता, पुणे महानगर प्रदेश हा गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असणार आहे. त्याकरिता खाजगी आणि थेट परकीय गुंतवणूक विभाग खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे -

भांडवली गुंतवणुकीच्या योग्य परताव्यासाठी पायाभूत प्रकल्पांसाठी परकीय गुंतवणूक आकर्षित करणे.
भांडवलदारास त्याच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठी भारत सरकारने अवलंबिलेल्या विशेष धोरणाचा अवलंब करणे.
मध्यम व दीर्घकालीन गुंतवणुकीकरिता खाजगी गुंतवणूकदारांच्या सहभागास प्रोत्साहन देणे.
पुणे महानगर क्षेत्रामध्ये नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण करून अर्थकरणाला गती देणे.

स्थानिक आणि परकीय गुंतवणूकदारांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकाधिक चांगल्या विकास संधी उपलब्ध करून देईल. विकसित देशांमधील अर्थव्यवस्थेची मर्यादित वाढ पाहता त्यांच्या तुलनेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्रात गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्मितीची सर्वोत्तम संधी असेल.

ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
sece.pmrda-mh@gov.in ९८८१३५९९९९ ९८८१३५९९९९