पुणे महानगर क्षेत्राचे जागतिक दर्जाच्या आर्थिक विकासाचे भारतातील प्रमुख केंद्र म्हणून रुपांतर होण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करणेचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे महानगर क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणूकीस चालना देण्याचा मुलभूत उद्देश त्याद्वारे साध्य होईल. पुढील वाटचालीमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
पुढच्या कारवाईसाठी पाऊल समावेश-
- दीर्घ मुदतीसाठी आर्थिक विकसन आराखडा तयार करणे.
- पुणे महानगर प्रदेशाने निर्धारित केलेले नागरीकरणाचे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी विविध स्थानिक संस्था व प्रशासनाशी सुसंवाद प्रस्थापित करणे.
- माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सर्वांसाठी आवश्यक माहिती सहजतेने उपलब्ध करून देणे.
- उत्पादन क्षेत्र , सेवा क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, गृहनिर्माण क्षेत्र, आणि इतर उभरत्या क्षेत्रांना प्रोत्साहन देणे.
- पुणे महानगर क्षेत्रातील नागरिकांना उतमोत्तम सेवा पुरवणाऱ्या आधुनिक व अद्ययावत संस्थेची उभारणी करणे.
- सशक्त आणि भक्कम सुसंवाद साधण्यासाठी व्हर्चूअल कार्यालयाची उभारणी करणे.
- सांस्कृतिक वारसा असलेला विकास आराखडा तयार करणे.
- उच्चतम व्यवसायिक सुलभता येण्यासाठी पुढे नोंदविलेल्या उत्तमोत्तम साधनांचा वापर करणार आहोत. जसे कि, अस्तित्वातील जमीन वापराचे नकाशे (हाय रिझोल्यूशन) तयार करणे, प्रदेशाचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास करणे, भूभागाचे भौगोलिक संदर्भ प्रस्थापित करणे, भूगर्भातील भागाचा व भू पृष्ठाचा अभ्यास करणे तसेच, व्यवसाय सुलभतेसाठी माहितीची उपलब्धता कोणत्याही अडचणीशिवाय सहजगत्या व मोफत उपलब्ध करून देणे.