उत्कृष्टतेकडून सर्वोत्कृष्टतेकडे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील उत्कृष्टता केंद्र हे संस्थेतील प्रशिक्षण, संशोधन आणि आधारभूत उपक्रम यांवर लक्ष केंद्रित करेल. तसेच प्राधिकरणाची स्पर्धात्मक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी या विभागामार्फत विविध सेवांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती अंगीकारण्यासाठी सातत्याने अभ्यास करीत राहील.

भागधारकांच्या प्रशिक्षणांमधूनही महसूल निर्माण करून त्या आधारे उत्कृष्टता केंद्र स्वबळावर चालणारे असेल. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी नव्याने विकसित होणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले जातील.

उत्कृष्टता केंद्राची ठळक वैशिष्टे

अंतर्गत आणि बहि:स्थ भागधारकांसाठी प्रशिक्षणाचे सुलभीकरण करणे.
प्रशिक्षित भागधारकांद्वारे सर्व नागरिकांपर्यंत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध सेवा पोहोचविणे.
नगरनियोजनाचा एकसंध भाग म्हणून संशोधन आणि विकासासारखे उपक्रम राबविणे.
संस्थेची वाढ आणि विकास पर्यावरणहिताय पद्धतीने राबविणे.
नागरिक तथा भागधारकांचे शंकानिरसन करण्यासाठी सर्वोत्तम पध्दती आरंभित व स्थापित करणे.
ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
dy.ceopmrda-mh@gov.in ९९२३४६१०४६ ९९२३४६१०४६