व्यापार व उद्योगाकरिता पोषक वातावरण निर्मिती करणे.
व्यापारासाठी मुबलक प्रमाणात बहुविध संधी निर्माण करणे.
पारदर्शक प्रशासन व्यवस्था असलेले व्हर्चूअल कार्यालय स्थापित करणे.
थेट परदेशी गुतंवणूक आकर्षित करणे.
खासगी स्थानीक गुंतवणूकीसाठी सुलभ वातावरण तयार करणे.
संसाधन निर्मिती क्षमतेत वाढ करणे.
बहुराष्ट्रीय व परदेशी गुंतवणूक संस्थांसाठी पुणे महानगर प्रदेश हे सर्वाधिक पसंतीचे केंद्र म्हणून विकसित करणे हे प्राधिकरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.
हे सर्वोच्च उद्दिष्ट साधण्यासाठी आमची भविष्यातील वाटचाल खालीलप्रमाणे असेल
थेट परदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ वाढविण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
पुणे महानगर प्रदेश परकीय गुंतवणुकीसाठी अग्रस्थानी ठेवण्यासाठी आवश्यक व्यापार वातावरण आणि पारदर्शक प्रशासन व्यवस्था कार्यरत ठेवण्याकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कटिबद्ध आहे.