पुणे महानगर सन्मान

श्रि. उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री तथा अध्यक्ष, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

अभूतपूर्व झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणामुळे संपूर्ण जगाचे सातत्याने नागरीकरण होत आहे. आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये पुढील तीन ते चार दशकांमध्ये नागरीकरणाची सर्वात जास्त वाढ अपेक्षित आहे. नागरीकरणाचा हा जागतिक कल भारतातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, तंतोतंत प्रतिवर्तीत झालेला दिसून येतो. सुसूत्र आणि नियोजनबध्द विकासास चालना देऊन महाराष्ट्र राज्य हे रोजगार आणि साधनसंपत्तीमध्ये सर्वाधिक सक्षम करण्यावर माझा कटाक्ष आहे. आपल्या राज्याची नैसर्गिक साधनसामुग्री व क्षमता विचारात घेऊन होणारे नागरीकरण योग्य दिशेने मार्गक्रमण करेल याची मी ग्वाही देत आहे. वरील धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून महाराष्ट्रात विकसित होत असलेल्या अनेक संस्थांपैकी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ ही एक प्रमुख संस्था आहे. जागतिक आर्थिक पातळीवर भारताची दिमाखदार घोडदौड पाहता महाराष्ट्रास कायम अग्रेसर ठेवताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्वाची भूमिका साकार करावयाची आहे. त्यानुसार प्राधिकरणास सर्वार्थाने बळ देण्यास राज्य शासन कटिबध्द आहे.


श्रि. अजित पवार

पालक मंत्री, पुणे जिल्हा

पुणे हे भारतातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक मह्त्वाचे महानगर असल्याने त्याचा नियोजनबध्द विकास ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये रोजगाराकरिता येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे महानगराच्या नियोजनबध्द विकासासाठी राज्य सरकारने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी सुयोग्य ठिकाण निर्माण करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पोषक पायानिर्मिती करेल याची मी ग्वाही देत आहे.


श्रि. सुहास दिवा भा.प्र.से

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

झपाटयाने होणारे नागरीकरण आणि अतिवेगाने होणारी आर्थिक प्रगती या कारणांमुळे एकविसाव्या शतकामध्ये मानवी प्रगतीचा केंद्रबिंदू हा पूर्वेकडील देशांकडे जास्त झुकणार आहे. वैश्विक पातळीवरील नागरीकरणाचे सध्याचे असलेले ३.५% क्षेत्र विस्तारून ९.५० ते १०% इतका भूभाग व्यापण्याची शक्यता आहे. सदर नागरीकरणाने आशिया आणि आफ्रिका खंडातील सुमारे ८ लाख चौरस किलोमीटर्स इतके क्षेत्र व्यापणार असून यामध्ये भारत आणि चीन हे देश अग्रणी राहणार आहेत. महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे. नागरीकरण संकल्पनेचा वापर प्रभावीरीत्या केला तर संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळून व्यवसाय सुलभता आणि सर्वोच्च जीवनशैली निर्देशांक या दोहोंबाबत हे प्राधिकरण एक उत्तम उदाहरण ठरू शकते हे आम्ही जगपटलावर मांडणार आहोत. अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांना आकर्षित करणारे ‘श्रेष्ठतम आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे मोक्याचे स्थान’ बनण्यासाठी हा प्रदेश सुसज्ज झाला आहे. भविष्यकालीन राहणी आणि व्यवसाय केंद्र म्हणून हा प्रदेश नावारूपास येईल हे निश्चित! नागरीकरण प्रक्रियेमध्ये अंतर्भूत काही दोषांच्या परिणामस्वरूप, नागरी समस्या आणखी क्लिष्ट होण्याची शक्यता असते. याचा सखोल अभ्यास करून एक दोषरहित भविष्यवेधी आराखडा तयार करण्यात येईल. उर्जेचा किमान दरडोई वापर, कामाच्या ठिकाणी सहज चालत जाता येईल अशी व्यवस्था, जनसामान्यांसाठी अत्यंत वेगाने कार्यरत असणारी वाहतूक व्यवस्था, निसर्ग आणि पर्यावरणाचा पोषक विकास, अत्यंत कार्यक्षम अशी नागरी व्यवस्थापन व प्रशासन व्यवस्था, रोजगार आणि समृध्दीस चालना, संस्कृती आणि परंपरा यांना उत्तेजन आणि मानवी मूल्यांवर आधारित सशक्त अर्थव्यवस्था हे घटक या आराखड्याची वैशिष्ठ्ये असतील. थोडक्यात, जीवनशैली निर्देशांक उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा या उद्देश्याने पारंपारिक पद्धती व आधुनिकता यांच्या समन्वयाने होणारे नागरीकरण (स्टार्ट – अप) म्हणजेच पुणे महानगर विकास प्राधिकरण !

आमच्या संघ

श्रीमती. कविता द्विवेदी (आय.ए.एस)

(अतिरिक्त महानगर आयुक्त)

श्री. श्रीहरी खुर्द

(मुख्य लेखा व वित्त अधिकारी)

श्री. विवेक खरवडकर

(मुख्य अभियंता)

श्री. अभिराज गिरकर

(सहसंचालक, नगररचना व महानगर नियोजक)

श्री. निलेश अष्टेकर

(पोलिस अधीक्षक)

श्री. देवेंद्र पोटफोडे

(मुख्य अग्निशमन अधिकारी)

श्रीमती. मोनिका सिंग

(अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी)