श्रि उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री तथा अध्यक्ष, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
अभूतपूर्व झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणामुळे संपूर्ण जगाचे सातत्याने नागरीकरण होत आहे. आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये पुढील तीन ते चार दशकांमध्ये नागरीकरणाची....
मुख्यमंत्री तथा अध्यक्ष, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
अभूतपूर्व झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणामुळे संपूर्ण जगाचे सातत्याने नागरीकरण होत आहे. आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये पुढील तीन ते चार दशकांमध्ये नागरीकरणाची....
अभूतपूर्व झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणामुळे संपूर्ण जगाचे सातत्याने नागरीकरण होत आहे. आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये पुढील तीन ते चार दशकांमध्ये नागरीकरणाची सर्वात जास्त वाढ अपेक्षित आहे. नागरीकरणाचा हा जागतिक कल भारतातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, तंतोतंत प्रतिवर्तीत झालेला दिसून येतो. सुसूत्र आणि नियोजनबध्द विकासास चालना देऊन महाराष्ट्र राज्य हे रोजगार आणि साधनसंपत्तीमध्ये सर्वाधिक सक्षम करण्यावर माझा कटाक्ष आहे. आपल्या राज्याची नैसर्गिक साधनसामुग्री व क्षमता विचारात घेऊन होणारे नागरीकरण योग्य दिशेने मार्गक्रमण करेल याची मी ग्वाही देत आहे. वरील धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून महाराष्ट्रात विकसित होत असलेल्या अनेक संस्थांपैकी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ ही एक प्रमुख संस्था आहे. जागतिक आर्थिक पातळीवर भारताची दिमाखदार घोडदौड पाहता महाराष्ट्रास कायम अग्रेसर ठेवताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्वाची भूमिका साकार करावयाची आहे. त्यानुसार प्राधिकरणास सर्वार्थाने बळ देण्यास राज्य शासन कटिबध्द आहे.
महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
झपाटयाने होणारे नागरीकरण आणि अतिवेगाने होणारी आर्थिक प्रगती या कारणांमुळे एकविसाव्या शतकामध्ये मानवी प्रगतीचा....
झपाटयाने होणारे नागरीकरण आणि अतिवेगाने होणारी आर्थिक प्रगती या कारणांमुळे एकविसाव्या शतकामध्ये मानवी प्रगतीचा केंद्रबिंदू हा पूर्वेकडील देशांकडे जास्त झुकणार आहे. वैश्विक पातळीवरील नागरीकरणाचे सध्याचे असलेले ३.५% क्षेत्र विस्तारून ९.५० ते १०% इतका भूभाग व्यापण्याची शक्यता आहे. सदर नागरीकरणाने आशिया आणि आफ्रिका खंडातील सुमारे ८ लाख चौरस किलोमीटर्स इतके क्षेत्र व्यापणार असून यामध्ये भारत आणि चीन हे देश अग्रणी राहणार आहेत.