उज्वल भविष्याची जडणघडण

शाश्वत विकास आणि अमर्याद आर्थिक संधीची उपलब्धता हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे गठनामागील मुख्य हेतू आहे. हे उद्दिष्ट वास्तवात आणण्यासाठी प्राधिकरणाच्या प्रत्येक कार्यामध्ये खालील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. -

उद्दिष्टे

pin pointer

जगातील सर्वाधिक आकर्षक आणि किफायती असे श्रेष्ठतम आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र उभारणे

pin pointer

दीर्घकालीन भविष्यातील शाश्वत आर्थिक विकासाकरिता अर्थव्यवस्थेमधील नव्याने उर्जित होणाऱ्या नवनवीन क्षेत्रांचा परामर्श घेणे.

pin pointer

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील नागरिकांसाठी जीवनशैली निर्देशांक अग्रेसर राहील या अनुषंगाने भू–वापराचे नियोजन करणे.

pin pointer

‘विकासाला चालना देणारा प्रदेश’ म्हणून पुणे महानगर प्रदेश सर्वत्र ओळखला जावा, यासाठी अभिनव शासकीय व्यवस्थेच्या जोडीने बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे.

pin pointer

प्राधिकरण क्षेत्रामध्ये संस्कृती आणि वारसा यांची संवर्धनात्मक वातावरण निर्मिती करणे.

नगरनियोजनाचा भविष्यवेधी दृष्टीकोन

pin pointer

सुयोग्य व्यवसाय-सुलभता

pin pointer

प्रस्तावांना त्वरेने विनासायास मंजूरी

pin pointer

अविकसित क्षेत्राचा सुनियोजित विकास

pin pointer

निसर्ग आणि पर्यावरण यांमध्ये संतुलन/सुधारणा

pin pointer

पायाभूत क्षेत्राचा विकास

pin pointer

दरडोई उर्जेचा किमान वापर

pin pointer

सुधारित जीवनमान आणि उच्च जीवनशैली निर्देशांक

pin pointer

रहिवास व कामाच्या ठिकाणी जवळीक असणारा परिसर विकास

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नियोजन साधने, भागधारकांप्रती बांधिलकी आणि विविध क्षेत्रातील समन्वय यांच्या सहाय्याने शाश्वत नागरी समस्या निराकरणाच्या विविध उपायांची निश्चिती करेल. पुणे महानगर प्रदेशाच्या सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा मार्ग जोखला जाईल. अस्तित्वातील विकसित क्षेत्रे तथा निर्माण होणारी नवीन क्षेत्रे यांच्यासाठी हा प्रयोग खूपच फायदेशीर ठरेल, हे निश्चित !

पायाभूत सुविधा आणि हरीतक्रांती विकसन यांना केंद्रस्थानी ठेऊन अस्तित्वातील विकसित आणि विकसनशील क्षेत्रांच्या गरजांचा शाश्वत विकास घडवुन आणणे हा नगर नियोजनाचा गाभा राहील. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील भावी पिढ्यांचा अधिवास या विकसित प्रदेशामध्येच होणार असल्याने त्यांच्या उत्पादकता क्षमतेस पुरेपूर संधी मिळणार आहे.

नगरनियोजनाच्या भविष्यवेधी दृष्टीकोनामुळे शाश्वत राहणीमान लक्षणीयरित्या उंचावेल आणि परिणामी या क्षेत्रातील रहिवाश्यांचा जीवनशैली निर्देशांक उच्चतम राहील.