शाश्वत पर्यावरणीय आराखडा

pin pointer

नागरीकांना रोजगार मिळण्यास सहाय्य

pin pointer

विद्यमान जमीन वापर दर्शविणारा नकाशा (ELU).

pin pointer

पाणी तथा इतर संसाधनांचा ऱ्हास रोखून त्यांचा किमान वापर तसेच पुनर्वापर यावर भर

pin pointer

पर्यावरणीय परिसंस्थेचा सुधार

pin pointer

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संगणकीय कार्यालय उभारणी

pin pointer

सार्वजनिक व्यवस्थेचा कमाल वापर होईल अशा संचार व्यवस्थेस प्रोत्साहन

pin pointer

संस्कृती आणि वारसा यांचा लौकिक होईल अशा पद्धतीने जमिनीचा वापर

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील रहिवाशांचे एकूण राहणीमान व जीवनमान उच्च तसेच समृद्ध करण्यासाठी आर्थिक, पर्यावरण आणि सामाजिक संस्कृती आदी पैलूंचा विचार करून शाश्वत विकास घडवून आणणे हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हेतू पुर्ण करण्यास प्रयत्नशील राहू. योग्य नियोजनाने अस्तित्वातील जमिनींचा अधिक सुयोग्य वापर करून पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास टाळून तसेच त्याचा पुनर्वापर करून भविष्यकाळात मुबलक संसाधने अबाधित ठेवण्यात येतील. प्रदूषणाची पातळी किमान राखून दळणवळण - व्यवस्था सक्षम करण्यासाठी सार्वजनिक वाहतुक तसेच व्हर्चुअल कार्यालयांना प्रोत्साहन देण्यात येईल.

पुणे महानगर प्रदेशाची अनेक शतकापासून परंपरागत चालत आलेली संस्कृती आणि वारसा यांचा जीर्णोध्दार करून त्या पुनर्गठीत करणे हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उत्तरदायित्व आहे. यातून नागरिकांना उदरनिर्वाहासाठी आणखी पर्याय उपलब्ध होऊन एकुणच सुबत्ता वाढीस लागेल हा उद्देश आहे.