भू – नियोजन आणि व्यवसाय सुलभता

भू-नियोजन विभाग पायाभूत सुविधांचा विकास करतांना पर्यावरणावरील आघात लक्षात घेऊन विकास साधेल, तसेच स्वच्छ व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन, कार्बन फूटप्रिंट व्यवस्थापन, लोककलांना प्रोत्साहन अशा विविध उद्दिष्टांनी काम करेल.

भू नियोजन आणि व्यवसाय सुलभता विभागाची ठळक उद्दिष्टे पुढीलप्रमाणे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यमान जमीन वापर (ELU ) नकाशा तयार करण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करणे.
नियोजित साधनांची योग्य प्रस्थापना करून व्यवसाय सुलभतेमध्ये सुधार घडविणे, ज्यायोगे नागरिक, भागधारक, प्रशासक, गुंतवणूकदार, आणि व्यावसायिक समुदाय इ. सर्वाना कार्यक्षम सेवा पुरवणे.
डिजिटल माहिती २४ तास उपलब्ध करून प्रशासन सेवेचे बळकटीकरण करणे. (ज्यायोगे अंतिम ग्राहकांच्या वैधानिक आणि नियमन गरजांकरिता वाढीव कार्यक्षमतेमध्ये वाजवी दरात सेवा उपलब्ध होवू शकतील).
पुणे महानगर प्रदेशामध्ये धोरणांची सातत्याने पडताळणी आणि संसाधानाचे शाश्वत व्यवस्थापन करणे.
पुणे महानगर प्रदेशातील नियोजन, व्यवस्थापन आणि मूल्यमापन प्रणालींमध्ये सुधारणा करणे.
पुणे महानगर प्रदेशामध्ये डिजिटल अधिकाराने सक्षम असलेला समाज तसेच ज्ञानकेंद्र यामध्ये परिवर्तन घडविणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रीय सहभागाकरिता समुदायाला सक्षम करणे .

भू- नियोजन विभागांच्या प्रकल्पांची ठळक वैशिष्टे

विद्यमान जमीन वापराचे (ELU) नकाशे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये उच्च पृथ:करणाची (High Resolution) हवाई छायाचित्रे (१० सेंटीमीटर पर्यंतच्या अचुकतेची) संपादित करणे.
महसुलाची भौगोलिक – संदर्भिय व्यापक माहिती मिळावी यासाठी भूमापन नोंदी मुख्य माहिती भांडारामध्ये समाविष्ट करणे.
डिजिटल नकाशे वापरून अविकसित भागांचा विकास करणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये माहितीचा साठा, पडताळणी आणि तक्रार निवारण यासाठी अत्यंत भक्कम डिजिटल पायाभूत माहिती केंद्राची उभारणी करणे.
सर्व भागधारकांना माहिती हाताळण्याची संधी मिळावी यासाठी (२४ x ७) अविरत कार्यरत असलेले वेब पोर्टल, तसेच मोबाईल अॅप विकसित करणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सर्व कार्याचे एकत्रीकरण करून ५ वर्षे त्याची देखभाल करण्यासाठी जीआयएस (GIS) आधारित उपक्रमाची उभारणी करणे.

भू नियोजन आणि व्यवसाय सुलभता प्रकल्पाचे फायदे

नागरिकांसाठी

माहिती हाताळण्यासाठी सुधारित सुविधा जेणेकरून खर्चात बचत.
जलद व्यावसायिक प्रक्रिया आणि वर्धित निर्णय प्रक्रिया.
उच्च सेवा प्रदानता
कर्मचाऱ्याची वाढीव उत्पादन क्षमता
पारदर्शक कायदेशीर तसेच नियामक प्रक्रिया
डिजिटल– नोंद व्यवस्थापनाद्वारे कमीत कमी व्यावसायिक संदिग्धता
अत्यंत प्रभावी निराकरणासाठी डिजिटल माहितीचा वापर
सेवा एकत्रीकरण आणि आपत्कालीन प्रतिसादाकरिता सर्वसमावेशक तत्पर सेवा
विश्वासार्ह आणि जबाबदार डिजिटल डेटा
आपत्काळानंतर व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी सक्षम व्यवस्था
पर्यायी माहिती साठा निर्मिती आणि माहिती - साठवणीच्या खर्चात बचत.
डिजिटल माहिती तंत्रज्ञानामुळे 3-डी माहितीची उपलब्धता

अन्य शासकीय विभागांसाठी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संसाधन माहिती प्रणालीमध्ये डिजिटल माहिती भांडाराचे एकत्रीकरण.
परिणामकारक नगर नियोजनाची प्रक्रिया
भू वापर आणि बांधकाम नियमनातील सुलभता
सामाजिक आर्थिक विकास नियोजन
आपत्कालीन सेवांसाठी माहितीची तत्पर उपलब्धता
अग्निशमन आणि आरोग्य विभागाकरिता डिजिटल माहितीची उपलब्धता
सार्वजनिक सुविधांसाठी माहितीचे डिजिटल माहिती भांडार
आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रत्यक्ष पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे जलदपणे नियोजन आणि निर्माण
घरगुती, औदयोगिक आणि व्यावसायीक पाणी वापराच्या नोंदीची प्रणाली
रस्ते, पूल, पथदिवे, खेळासाठी मैदाने, बागा, पार्किंगसाठी थांबे, बस – थांबे आणि विविध नागरी सुविधा यांसाठीची एकत्रित माहिती उपलब्धता
ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
mpp.pmrda-mh@gov.in ९७३००१३५७२ ९७३००१३५७२