उज्ज्वल भविष्यासाठी स्मार्ट संसाधन व्यवस्थापन

आर्थिक नियोजनाचा सर्वोत्तम वापर करून उपलब्ध संसाधनांचे एकत्रीकरण करणे, त्यामध्ये वृद्धी करणे या उद्देशाने संसाधन व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. पारंपारिक आणि अपारंपारिक पध्दतींचा समन्वय साधून संसाधनामध्ये वृदधी घडवून आणणे हे या विभागाचे लक्ष्य आहे.

संसाधन व्यवस्थापन विभागाची वैशिष्ट्ये

संसाधनाचे एकत्रिकरण व त्यामध्ये अधिकाधिक वृद्धी यासाठी नाविन्यपूर्ण पध्दतींचा वापर करणे.
अर्थव्यवस्थेतील नवनवीन संकल्पना आणि उपलब्ध भूसंसाधन याद्वारे सर्वाधिक परतावा मिळविणे.
बाँड (विकासपत्र) या माध्यमातून तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या मदतीने संसाधने प्राप्त करून घेणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि इतर सर्व भागीधारांमधील आर्थिक उलाढालीकरिता अत्यंत कार्यक्षम व सुलभ अशा रक्कम आदानप्रदान व्यवस्थेची निर्मिती करणे.
सामान्य नागरिक हा आर्थिक संसाधनांच्या विकासामध्ये केंद्रस्थानी ठेवणे.

संसाधन व्यवस्थापन विभागाचे कार्य

संसाधन व्यवस्थापन विभाग खालील पद्धतीने काम करेल

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
लेखापरीक्षणासोबतच सर्व सांविधानिक नियंत्रणाचा अवलंब करणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वार्षिक लेखे तयार करणे.
सर्व पावत्या,लेखा आणि देयके यांचे अंतर्गत लेखापरीक्षण करून घेणे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे व्यवसाय, पर्यटन, निवास इ.साठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात महत्वाचे केंद्र बनेल. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभाग एकत्रितपणे व समन्वयाने कार्यरत राहतील.

भक्कम आर्थिक निकषांच्या आधारावर भक्कम जीवनशैली निर्देशांक यासाठी प्राधिकरण सतत कार्यरत राहील.

ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
cafo.pmrda-mh@gov.in ९८२२९६७९०९ ९८२२९६७९०९