भविष्यवेधी कार्यक्षम मानव संसाधन विकास

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे व्यवसाय सुलभता निर्माण करणे तसेच नागरीकांशी सुसंवादाद्वारे विविध प्रक्रियांतील पारदर्शकता वर्धित करणे या गोष्टी साध्य करण्याचे ध्येय आहे. प्रशासकीय प्रक्रियांचे प्रमाणीकरण करून तसेच गुणवत्तेला प्राधान्य देऊन प्राधिकरणाच्या कामकाजात सेवाभिमुखता आणता येईल.

किमान खर्च, संसाधनांचा समतोल वापर आणि कमाल उत्पादकता या तीन गोष्टींवर प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. कार्यान्वयन आणि मानव-संसाधन व्यवस्थापन विभाग पुणे महानगर नगर विकास प्राधिकरणाची ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे.

कार्यान्वयन आणि मानव-संसाधन विकास विभागाची ठळक वैशिष्ट्ये

प्रशासन आणि निर्णय प्रक्रियांबाबत सर्वस्वी नवीन दृष्टीकोन अंगीकारणे.
खाजगीकरणाद्वारे प्राधिकरणाच्या खर्चात बचत करणे.
सरकारी संस्थांवर नागरिकांनी कमीत कमी अवलंबून राहावे यासाठी आदर्श व्यवस्था निर्माण करणे.
नागरिकांसाठीच्या कल्याणकारी उपक्रमांवर सतत भर देणे.
नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी भागधारकांचा नियोजन प्रक्रियेमध्ये समावेश करून घेणे.
पुणे महानगर प्रदेशामध्ये अत्युच्च-कार्यक्षमता असलेली व्हर्चूअल कार्यालयांची उभारणी करून संगणकीय (ऑनलाईन) सेवा उभारणी करणे.
किमान कर्मचाऱ्यांसह २४x७ कार्यरत असलेल्या व्हर्चूअल कार्यालयांचे गठण करणे.

कार्यान्वयन आणि मानव-संसाधन विकास विभागाची फलनिष्पत्ती

डिजिटल माहिती देवाणघेवाण आणि सहज उपलब्धता “सेवा हमी कायदा” आणि “माहितीचा अधिकार अधिनियम” याला अनुसरून ऑनलाईन संचार प्रणालीस प्रोत्साहन.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संकेतस्थळाद्वारे नागरिकांच्या तक्रारींची इंटरनेटच्या माध्यमातून तात्काळ नोंदणी.
तक्रारींची सद्यस्थिती तात्काळ स्पष्ट व्हावी यासाठी प्रत्येक तक्रारीकरिता विशिष्ट क्रमांक.
व्हर्चूअल कार्यालय, अॅपद्वारा ग्राहक व विविध शासकीय विभागांकडून झालेल्या पत्रव्यवहारांचे व्यवस्थापन.
बहिस्थ वापरकर्त्यासमवेत झालेल्या सर्व देवाणघेवाणी संबंधित बाबींचे डिजिटल माहिती व्यवस्थापन.
ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
dy.ceopmrda-mh@gov.in ९९२३४६१०४६ ९९२३४६१०४६