नागरिकांच्या गरजेनुरूप वेळोवेळी मूल्यवृद्धी देणे

अस्तित्वातील आणि चालूस्थितीतील अवैध बांधकामांवर कारवाईसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील वर्तन प्रणाली व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या अवैध विकासकामांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना जीवाचा धोका संभवतो. तसेच आर्थिकदृष्टया संवेदनशील क्षेत्रांमध्ये व्यावसायिक विकासाचा वेगही मंदावतो.

अनियोजित नागरी विकास आणि अवैध बांधकामांमुळे शहराचे नियोजन आणि त्या क्षेत्रातील पर्यावरण संतुलनही विस्कळीत होते. त्यामुळे वैध नियमांचे पालन करणाऱ्या बांधकामांना यथोचित सहाय्य करणे आणि अवैध तसेच बेकायदेशीर बांधकामांवर कडक कारवाई करणे यावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कटाक्ष असेल. पुणे महानगर क्षेत्रात फक्त वैध आणि अधिकृत बांधकामांनाच उत्तेजन देऊन येथील जीवनमान उंचावणे आणि जीवनशैली निर्देशांक सुधारणे यावर भर असेल.

आयओएस, अँन्ड्रॉइड आणि इतर स्मार्टफोन्सवर विनामूल्य डाऊनलोड करता येण्याजोग्या मोबाईल अँपचा वापर वर्तन प्रणाली व्यवस्थापन विभागामार्फत करणेत येतो. आपले नाव गुप्त ठेवून नागरिक या अँपद्वारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अवैध अथवा बेकायदेशीर बांधकामांबाबत माहिती देऊन कठोर कारवाईची मागणी करू शकतात. अवैध वागणूकीला पायबंद घालण्यासाठी जनसामान्यांचा सहभाग प्राप्त करून घेणारी ही पहिली पायरी आहे.

वर्तन प्रणाली व्यवस्थापन विभागाची ठळक वैशिष्ट्ये

अस्तित्वातील बेकायदेशीर बांधकामे निष्कासित करणे आणि संबंधित व्यक्ती अथवा पक्षकार यांच्याशी तदनुषंगिक मुद्दयांचा पाठपुरावा करणे.
जनसामान्यांच्या भल्यासाठी, सद्यस्थितीत चालू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांचे काम थांबवणे तसेच त्यांवर कायमस्वरूपी अंकुश ठेवणे.
बेकायदेशीर बांधकामांना आळा घालून रुंद रस्ते, मोकळया जागा, सार्वजनिक सुविधा क्षेत्रे यांसारख्या समाजोपयोगी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी उपाययोजना करणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मोबाईल अँपचा वापर करुन स्वत:ची ओळख गोपनीय ठेवून अनधिकृत बांधकामाची माहिती देण्यामध्ये लोकांचा सहभाग ‍मिळविण्यास उत्तेजना देऊन बेकायदेशीर बांधकामांवर करडी नजर ठेवणे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेबसाईटवर बेकायदेशीर बांधकामांची यादी प्रसिद्ध करून त्यायोगे संभाव्य खरेदीदारांसाठी माहितीचे प्रकटीकरण करणे.
सर्व कायदेशीर बांधकामांसाठी इमारत परवाना प्रमाणपत्र लगोलग संगणकावर नोंदणीकृत करून माहिती भांडारात समाविष्ट करून ठेवणे.

*कायदेशीर बांधकामे म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारा अधिकृतरित्या अथवा त्याआधी सक्षम अधिकाऱ्यांची विकास परवानगी घेऊन त्याबरहुकूम केलेली बांधकामे.

**बेकायदेशीर बांधकामे म्हणजे विकास परवानगी नसलेली वा मंजूर आराखडा तसेच त्याच्या शर्ती आणि अटींशी सुसंगत नसलेली अथवा त्याबरहुकूम नसलेली बांधकामे.

ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
व्हाट्स अँप नंबर ७७०९५१२४१४ ७७०९५१२४१४