अग्निशमन सेवा

‘अग्निशमन सेवा’ हि जीवित व वित्त हानी संरक्षणासाठी अत्यावश्यक सेवा आहे. अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि जीव संरक्षण ही अग्निशमन विभागाची मुख्य उद्दीष्ट्ये असून विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, राष्ट्रीय इमारत बांधकाम संहिता – २००५ व महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसुरक्षा अधिनियम - २००६ ला अधीन राहून अग्निशमन विभागामार्फत अग्निसुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात.

अग्निशमन सेवेची उद्दिष्टे

अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, अग्निशमन करणे, अग्निसुरक्षा प्रशिक्षण आणि जागरूकता हे तीन महत्वाची कार्ये पार पाडणे.

इमारतींच्या प्रस्तावित बांधकामांदरम्यान विकास, नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली व राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेस अधीन राहून अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. यामध्ये प्रामुख्याने इमारतीचे ठिकाण, इमारतीचा वापर, लोकसंख्या या बाबींचा विचार करून अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे.

अग्निशमन दलाची मदत प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यापुर्वी, इमारतीमधील स्थानिक रहिवाशांकडून, इमारतीमधील उपलब्ध अग्निशमन साधनांचा वापर करून प्राथमिक स्वरुपातील आगीवर नियंत्रण ठेवणे याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.

इमारतीचा वापर व उंचीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना सुचवून तदनुषंगाने अग्निशमन यंत्रणेकडून प्राथमिक अग्निशमन ना- हरकत दाखला व अंतिम अग्निशमन ना - हरकत दाखला देणे.

आपत्तकालीन काळात मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकाची यादी खालीलप्रमाणे

अ.क्र. अग्निशमन सेवा फोननंबर
मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए ०८१०८०७७७७९
पुणे महानगर पालिका,अग्निशमन सेवा (मुख्यालय) ०२०-२६४४३१०१/२६४५१७०७/२६४४५१०१
पुणे कॅन्टोनमेंट अग्निशमन सेवा ०२०-२६४५०४५३
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका,अग्निशमन सेवा (मुख्यालय) ०२०-२७४२३३३३/ २७४२२४०५
खडकी कॅन्टोनमेंट अग्निशमन सेवा २५८१९१५५/२५८१८८९३
एमआयडीसी अग्निशमन सेवा –हिंजवडी ०२०-२२९३४१०१/२२९३३१०१
एमआयडीसी चाकण अग्निशमन केंद्र ०२१३५-२०३५००/२०३५१०
एमआयडीसी तळेगाव अग्निशमन केंद्र ०९४२२४३७१८३/९४२२४३७१८४
तळेगाव नगरपालिका अग्निशमन केंद्र ९१५८७७९००९
१० एमआयडीसी रांजणगाव अग्निशमन केंद्र ०२१३८-२३२६५९/२३२७०१
११ एमआयडीसी बारामती अग्निशमन केंद्र ०२११२-२४४७१०/२४४७२०
१२ बारामती नगरपालिका अग्निशमन केंद्र ०२११२-२२७२०
१३ आळंदी नगरपालिका अग्निशमन केंद्र ०२१३५-२३२३८३
१४ जुन्नर नगरपालिका अग्निशमन केंद्र ०२१३२-२२२३१०३
१५ संपर्क ईमेल cfo.pmrda-mh@gov.in

प्रशिक्षण व जागृती : आगीमुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांचा व विध्यार्थांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असून त्यासाठी परिसरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग यांना अग्निशमन सुरक्षिततेचे प्रशिक्षण व जागृकता इ. साठी विविध कार्यक्रम प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात येतात.

प्रत्येकाला अग्निसुरक्षा देणेसाठी आम्ही कटिबध्द असून:

"सुरक्षेकरिता सेवारत” असे आमचे ध्येय आहे"